जवसाची चटणी :(Flaxseed Chutney)
जवसाची चटणी :
साहित्य : १ वाटी जवस, आर्धी वाटी भाजलेले दाणे, अर्धी वाटी किसलेले खोबरे, ब्याडगी मिरच्या वाटीभर (नसल्यास) मोठा चमचा लाल तिखट,मीठ चवीप्रमाणे, लसुण पाकळ्या ६ ते ८
कृती
जवस चांगले भाजणे (भाजताना तडतड आवाज झाला आणि किंचित रंग बदलला कि भाजलेत असे समजणे),खोबरे किसून भजुन घेणे, शेंगदाणे पण भजलेले घेणे. सर्व साहित्य वेगवेगळे मिक्सर मधुन बारीक करणे नंतर सगळे एकत्र करुन पुन्हा एकदा बारीक करणे
जवसा ऐवजी कारळे तीळ घेतले कि कारळ्याची चटणी होते

Comments
Post a Comment