कटाची आमटी

 कटाची आमटी


साहित्य : १ वाटी हरबरा डाळ, चिंच चमचाभर ,गूळ (मोठा चमचा) ,तीळ छोटा चमचा, मेथीचे दाणे पाव चमचा(१५ ते २० दाणे) ,कढीपत्ता,हिंग


कृती :


   एक वाटी हरबरा डाळीत आडीच ते तीन वाट्या पाणी घालून कुकरमध्ये शिजवावी,तीन ते चार शिट्ट्या कराव्या.डाळ चांगली शिजली पाहिजे

  मग चाळणी किंवा मोठ्या गाळणे एका पातेल्यावर ठेवावे व त्यात ती शिजलेली डाळ गाळावी.पातेल्यात जे पाणी येते त्याला कट म्हणातात. गाळण्यात किंवा चाळणीत जी डाळ आहे त्याचे पुरण करायचे.


चमचा भर तेल कढईत गरम करायला ठेवणे.तेल तापल्यावर त्यात जिरे,मोहरी ,तीळ, मेथ्या,हिंग,कढिपत्ता घालणे मग त्यात कट घालणे.नंतर लाल तिखट, मीठ,काटादरे संडे मसाला (तो नसेल तर गोडा मसाला यालच काळा मसाला पण म्हणातात) घालणे. चिंच भिजत टाकायची तिचा कोळ घालाय़चा आणि गुळ घालायचा. ओले खोबरे व कोथिंबिर घालणे


जेंव्हा डाळ जास्त असेल (पुरणपोळी करणार असाल) तर वाटून झालेल्या पुरणाच्या वरचे न वाटले गेलेले पुरण आमटीत घालतात

 हि आमटी आधी पातळ वाटते मग दाट होते.


अंबट गोड आमटी आपल्याला आवडते त्यात लसूण,गरम मसाला घालु नये 


Comments