छोले - Shubhangee Rao
साहित्य : २०० ग्रॅम काबुली चणे,मोठा कांदा,२-३ लसुण पाकळ्या,१ टोमॅटो,सुके खोबरे लहान तुकडा,लाल तिखट पाव चमचा,छोले मसाला (एव्हरेस्ट ) छोटा चमचा १
कृती :
रात्री गरम पाण्यात काबुली चणे भिजवावे.सकाळी ते धुवुन कुकरला शिजवावे ,शिजताना थोडे मीठ घालणे,तीन ते चार शिट्ट्य़ा आणि मग सात आठ मिनिटे बारीक गॅसवर ठेवणे.१ टोमॅटो बारिक चिरणे
कांदा उभा चिरुन,खोबरे किसून घेणे. कांदा तेलावर गुलाबी रंगावर परतणे,खोबरे भाजुन घेणे,भाजलेला कांदा,खोबरे,लसुण ,आल्याचा छोटा तुकडा,लाल तिखट मिक्सरवर बारीक वाटणे
मोठा चमचाभर तेल गरम करणे,त्यात हिंग घालणे,नंतर चिरलेला टोमॅटो त्यात घालुन परतणे.टोमॅटो शिजला कि त्यात शिजलेले छोले घालणे , त्यातले थोडे छोले बजुल करुन अगदी बरिक स्मॅश करणे. मिक्सरमधील वाटप त्यात घालणे. स्मॅश केलेलेछोले घालणे ,चवीप्रमाणे मीठ घलणे.
असल्यास थोडी कसुरी मेथी घालावी.शेवटी छोले मसाला घालावा
वाढताना लिंबाची फोड द्यावी.


Comments
Post a Comment